निसर्गरम्य कास पठारावर विंटेज गाड्यांचा थरार; खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते याचे उद्घाटन, मोटारसायकलप्रेमींशी साधला संवाद

by Team Satara Today | published on : 15 July 2026


सातारा  : येझदी जावा ओनर्स क्लब महाराष्ट्र यांच्या वतीने निसर्गरम्य कास परिसरात २४ व्या आंतरराष्ट्रीय जावा येझदी दिवसाचे जल्लोषात आयोजन करण्यात आले होते. कास, सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या २४ व्या इंटरनॅशनल येझदी-जावा डे कार्यक्रमाचे उद्‍घाटन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उत्साहात झाले.

यावेळी खासदार भोसले यांनी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून आलेल्या मोटारसायकलप्रेमींशी संवाद साधला. मोटारसायकल हे केवळ प्रवासाचे साधन नसून इतिहास, परंपरा आणि जिव्हाळा जपणारी संस्कृती असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. या कार्यक्रमात १९५६ पासूनच्या दुर्मीळ, विंटेज आणि ऐतिहासिक येझदी-जावा मोटारसायकलींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या मोटारसायकलींची पाहणी करताना त्यामागील जतन, मेहनत आणि समर्पणाची दखल खासदार उदयनराजे यांनी घेतली.

महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, इस्लामपूर, पुणे, मुंबई, बारामती तसेच कर्नाटक राज्यातून तब्बल १५० हून अधिक क्लासिक येझदी-जावा मोटारसायकली या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक मोटारसायकल आपल्या काळातील उत्कृष्ट अभियांत्रिकी, गुणवत्ता आणि समृद्ध वारशाची साक्ष देत होती.

अशा उपक्रमांमुळे विंटेज वाहनांचा वारसा जतन होण्याबरोबरच नव्या पिढीला भारतीय मोटारसायकल संस्कृतीचा इतिहास समजण्यास मदत होत असल्याचे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले, तसेच या उपक्रमाचे आयोजन करणाऱ्या येझदी जावा ओनर्स क्लब महाराष्ट्राचे अभिनंदन करून सर्व सहभागी रायडर्सना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पत्रकार आदिल जल दारुखानावाला, यशराज पाटील, समीर मकानदार, सनी भोसले, शेखर चव्हाण, रोहित लाड, अमोल पाटुकले तसेच मोठ्या संख्येने सहभागी रायडर्स उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नीरा नदीवरील पुलावरून पडलेल्या एका वारकऱ्याचे एनडीआरएफच्या पथकाने वाचवले प्राण
पुढील बातमी
मोळाचा ओढा ते रामनगर रस्त्यावर कारने धडक दिल्याने तीनजण गंभीर जखमी; कार चालकाविरुद्ध गुन्हा

संबंधित बातम्या