सातारा जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय: दिवाळीनिमित्त स्थानिक सुट्टीत बदल; ६ नोव्हेंबरऐवजी आता ९ नोव्हेंबरला सुट्टी

by Team Satara Today | published on : 02 November 2026


​सातारा  : सातारा जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सन २०२६ मधील स्थानिक सुट्ट्यांच्या यादीत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी महत्त्वाचा बदल केला आहे.
​शासकीय राजनैतिक व सेवा विभागाच्या १६ जानेवारी १९५८ च्या अधिसूचनेनुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी १२ जानेवारी २०२६ रोजी काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील स्थानिक सुट्ट्यांच्या यादीत अ.क्र. ३ वर ६ नोव्हेंबर २०२६ (शुक्रवार - धनत्रयोदशी) रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
​मात्र, आता नवीन सुधारित आदेशानुसार ६ नोव्हेंबरऐवजी ०९ नोव्हेंबर २०२६ (सोमवार) रोजी दिवाळी निमित्त स्थानिक सुट्टी देण्यात आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सर्व विभागांनी दुष्काळी परिस्थितीत समन्वयाने काम करावे, जलजीवन मिशनच्या योजना प्राधान्याने पूर्ण कराव्यात - पालकमंत्री शंभूराज देसाई
पुढील बातमी
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांचे आवाहन

संबंधित बातम्या