सातारा : जुन्या एमआयडीसीतून अज्ञात चोरट्याने बोनेटची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुनी एमआयडीसी येथे अज्ञात चोरट्याने 60 हजार रुपये किंमतीचा 200 किलो वजनाचा बोनेट चोरुन नेला. याप्रकरणी अमोल वसंत कुंभार (रा.कोरेगाव) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.