पाळीव कुत्र्यावरून वाढे येथे दोन गटांत हाणामारी; परस्पर गुन्हे दाखल

by Team Satara Today | published on : 28 June 2026


सातारा : वाढे ता. सातारा येथे पाळीव कुत्र्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे हाणामारीत रूपांतर झाले. शंकर कदम यांच्या फिर्यादीनुसार, दिनकर, तेजस व तुषार जाधव यांनी मारहाण केली. तर तेजस जाधव यांच्या फिर्यादीनुसार, शंकर व आशिष कदम यांनी मारहाण करून दिनकर व तुषार यांना दुखापत केली. दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर गुन्हे दाखल झाले असून तपास सुरू आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पीएम स्वनिधी लाभार्थ्यांसाठी ३० जूनला साताऱ्यात लोककल्याण मेळावा
पुढील बातमी
अल्पवयीन मुलीचा पाठलाग; दोघांवर पोक्सोसह गुन्हा

संबंधित बातम्या