तामजाईनगर येथे युवकाची आत्महत्या

सातारा : तामजाईनगर येथे राहत्या घरी युवकाने आत्महत्या केल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, करंजे तर्फ तामजाईनगर येथे राजवर्धन प्रदीप ढमाळ (वय 23, रा.करंजे) या युवकाने राहते घरी पंख्याच्या हुकाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना 12 फेब्रुवारी रोजी घडली आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गोवेकर करीत आहेत.


मागील बातमी
अल्पवयीन मुलीचे अपहरण
पुढील बातमी
कारची काच फोडून कारमधील सोन्याचे दागिने लंपास

संबंधित बातम्या