सातारा : जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे अतिरेकी कारवायांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या 27 पर्यटकांना साताऱ्यात अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली. येथील मराठा व मुस्लिम समाजाच्या बांधवांनी येथील गोलबाग परिसरामध्ये पाकिस्तानच्या ध्वजाचे दहन करून आपला संताप व्यक्त केला. यामध्ये शिवसेनेचे संघटक सादिक बागवान, इतिहास प्रेमी अबू हसन शेख तसेच इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.पहेलगाम येथे पर्यटकांवर अतिरेक्याने जो हल्ला केला. त्यामध्ये 27 पर्यटक मृत्युमुखी पडले यामध्ये सातारा जिल्ह्यातील संतोष जगदाळे यांचाही समावेश आहे या घटनेचे सातारा जिल्ह्यात संतप्त पडसाद उमटत आहेत लोकांमध्ये संतापाची भावना आहे .हा संताप साताऱ्यामध्ये वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून गुरुवारी व्यक्त झाला सकल हिंदू समाजाने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केल्यानंतर मुस्लिम समाजाच्या काही बांधवांनी गोल बागेसमोर अतिरेक्यांना शासन झालेच पाहिजे अशा जोरदार निषेधाच्या घोषणा दिल्या व यावेळी पाकिस्तानचा झेंडा जाळून यावेळी राग व्यक्त करण्यात आला गोल बागेच्या समोर हे आंदोलन करण्यात आले. तसेच लोकशाही पुरोगामी संघटनेच्या वतीने पहेलगाम येथील घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना कॅण्डल रॅली काढून श्रद्धांजली वाहण्यात आली. या कॅन्डल रॅलीमध्ये 100 सदस्य सहभागी झाले होते. पहेलगाम येथील घटनेची नागरिकांनी निंदा व्यक्त करून मृतात्म्यांच्या आत्म्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. ही कॅन्डल रॅली गोलबाग मोती चौक तसेच तेथून वरून पुन्हा गोलबाग अशी काढण्यात आली. पोवई नाका येथे व्यापारी संघटनेच्या वतीने सुद्धा फलक झळकावून पहेलगाम येथील पर्यटकांच्या हत्येचा निषेध व्यक्त करण्यात आला. हा निषेध येथील सेल्फी पॉईंट च्या समोर व्यापाऱ्याने उभे राहून पाकिस्तान विरोधी निषेधाच्या घोषणा दिल्या.
पोवई नाका येथे मुस्लिम युवकांनी जाळला पाकिस्तानचा ध्वजपाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद अशा घोषणा देत साताऱ्यात विविध पक्षाच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याचा निषेध नोंदवला. दरम्यान, काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे प्रवक्ते अरबाज शेख यांनी अतिरेकी संघटना आणि पाकिस्तानवर कडक शब्दात निषेध व्यक्त केला.सातारा येथे पहलगाम हल्याचे पडसाद उमटले असून गुरुवारी विविध पक्ष, संघटनातील मुस्लिम पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पोवई नाका येथे निषेध नोंदवला. यावेळी काँग्रेसचे अरबाज शेख, ठाकरे गटाचे सादिक बागवान, शरद पवार गटाचे राहुल पाटोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी अरबाज शेख म्हणाले, देशात एकात्मता रहावी यासाठी सकल मराठा मुस्लिम समाज कायम अग्रेसर आहे.आज आपल्याला आपल्या शेजारी असलेला पाकिस्तान जाणून बुजून जातिजातीत धर्मधर्मात तेढ निर्माण करण्यासाठी गोळ्या घालून निरपराध नागरिकांना मारत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगायचे आहे की त्यांनी आम्हाला संधी दिली तर 20 हजार मराठा मुस्लिम तरुण पाकिस्तान मध्ये तयार आहेत. फक्त आम्हाला शस्त्र द्यावीत, बंदूकीच्या गोळ्या द्याव्यात, दोन तासांच्या आत भारताचा तिरंगा ईस्लामाबादमध्ये भारताचा फडकवल्याशिवाय राहणार नाही.शिवरायांच्या चरणी देतो. हे वेदनादायी कृत्य अतिरेक्यानी केलं आहे. एक चित्र व्हायरल होत आहे एक बहीण तिच्या पतीच्या मृतदेहाजवळ निशब्द बसली आहे. त्या आमच्या बहिणीला सांगायचे आहे की आम्ही तिच्या दुःखात सहभागी आहोत.पाकिस्तानला एकच सांगणं आहे की भारतात हिंदू मुस्लिम एक राहून पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम कसा लावायचा याची तयारी करत आहोत.मोदीजीनी राष्ट्रीयत्वची गरज ओळखून केंद्र सरकारने पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्राईक करावा, केंद्र सरकारला जमत नसेल तर आम्हाला पुढे करावं आम्ही आमच्या प्राणाची आहुती देऊन आमच्या बहिणीच्या कुंकुवाचा बदला घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्यांनी आम्हाला परवानगी द्यावी, आम्ही 4 हजार तरुणांच्या सहीचे पत्र सरकारकडे रवाना करत आहोत, असे त्यांनी सांगितले.
मराठा-मुस्लिम समाजाच्या वतीने सातारमध्ये पाकिस्तानी ध्वजाचे दहन
पहेलगांमधील अतिरेकी कारवायांचे संतप्त पडसाद
by Team Satara Today | published on : 24 April 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सव समारोप उत्साहात साजरा
January 17, 2026
विषारी औषध प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू
January 17, 2026
साताऱ्यात मंगळवार पेठेतून २१ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार
January 17, 2026
सातारा शहरात तीन दुकाने फोडून ७४ हजारांची रोकड लंपास
January 17, 2026
४० हजार रुपये किमतीच्या २०० किलो वजनाच्या अल्युमिनियम तारेची चोरी
January 16, 2026
सातारा एमआयडीसी व यशोदानगर येथून दुचाकी वाहनांची चोरी
January 16, 2026