सातारा : विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन 2020 ते 13 जानेवारी 2025 दरम्यान निशा कल्याण भोसले ( रा. कर्मवीर नगर, सातारा ) विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती कल्याण बाबासाहेब भोसले यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सुर्यवंशी करीत आहेत.