शहरातील अवैध धंदे बंद करण्याची शिवसेनेची मागणी

by Team Satara Today | published on : 04 August 2025


सातारा : सातारा शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून याला खतपाणी घातले जात आहे. अशा अवैध धंद्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे सातारा शहरप्रमुख निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रमुख तुषार दोषी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सातारा जिल्हा हा मराठ्याची राजधानी म्हणून ओळखला जातो. सर्वच क्षेत्रात सातारचे नाव अग्रेसर राहिले आहे. असे असताना सातारा शहर व परिसरात मटका, जुगार, चक्री, अवैध दारूविक्री अशा अवैध धंद्यांना ऊत आला आहे. याला पोलीस खात्यातील काहीजण खतपाणी घालत आहेत. याच्या व्यसनाधीनतेमध्ये जाऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अनेक तरुण झटपट पैसे मिळत असल्याने याकडे वळू लागले आहेत. त्यामुळे पुढील आठ दिवसात शहर व परिसरात सुरू असलेले अवैध धंदे बंद करावेत. अन्यथा शिवसेना स्टाईलने स्वतः अवैध धंद्यांवर धाड टाकणार आहे. यात अवैध धंदा आढळल्यास संबंधित व्यक्ती व त्या परिसरात असणार्‍या पोलीस अंमलदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावर पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी याबतची माहिती तात्काळ कळवा. संबंधितांवर कारवाई करू, असे आश्वासन दिले. 

यावेळी वैद्यकीय जिल्हाप्रमुख दीपक चव्हाण, शहर संघटक अमोल इंगोले, किरण कांबळे, उपशहरप्रमुख शुभम भिसे, अजिंक्य रजपूत, अनिकेत भिसे, प्रथमेश बाबर, तेजस जाधव आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
धक्कादायक! मामाकडून चिमुरडीला अमानुष मारहाण
पुढील बातमी
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीचा जिल्हा प्रशासनाला विसर

संबंधित बातम्या