सातारा : तालुक्यातील कण्हेर गावच्या हद्दीत कण्हेर ते जांभळेवाडी जाणाऱ्या कच्च्या रस्त्यालगत पोलिसांनी छापा टाकून देशी दारूचा साठा जप्त केला. गुरव यांच्या शेतजमिनीलगत ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत देशी दारू (संत्रा)च्या ९० मिलीच्या बाटल्यांचा साठा, ज्याची एकूण किंमत ४४ हजार ६०० रुपये आहे, तसेच एक दुचाकी जप्त करण्यात आली. याप्रकरणी सतीश बजरंग वाघमळे (वय ४६, रा. कण्हेर, ता. जि. सातारा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार विद्या कुंभार करत आहेत.