विनयभंगासह पैशांच्या फसवणूकप्रकरणी कोडोलीतील एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 04 May 2026


सातारा : महिलेच्या विनयभंगासह तिची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार महिलेने दादा दामोदर जाधव (रा. कोडोली, सातारा) यांना १२ लाख रुपये उसने दिले होते. या पैशांबाबत बोलणी करण्यासाठी दादा जाधव यांनी संबंधित महिलेस त्याच्या घरी बोलावून घेतले. ही महिला जाधव यांच्या घरात आल्यानंतर त्याने चाकूचा धाक दाखवून तिच्याशी असभ्य भाषेत संभाषण करून तिचा विनयभंग केला आहे. तसेच घेतलेल्या बारा लाख रुपयांमधील फक्त एक लाख पंधरा हजार रुपये परत करून दहा लाख 85 हजार रुपयांची तक्रारदार महिलेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार यादव करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महामार्गावर सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पुण्यातील दोन जणांवर गुन्हा
पुढील बातमी
मद्यप्राशन करण्यासाठी ग्राहकांना सुविधा पुरवल्याप्रकरणी हॉटेल मालकावर गुन्हा

संबंधित बातम्या