कराड : येथील बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलांच्या भांडणात गंभीर जखमी झालेल्या एका मुलाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून संतप्त नातेवाइकांनी बालसुधारगृहासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे पंधरा दिवसांपूर्वी सुधारगृहातील मुलांमध्ये वाद होऊन एका अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण करण्यात आली होती. गंभीर जखमी झालेल्या या मुलावर प्रारंभी येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती अधिक खालावल्याने त्याला पुढील उपचारांसाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. तेथे शनिवारी उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
मुलाच्या मृत्यूची माहिती समजताच संतप्त नातेवाइकांनी सुधारगृहाबाहेर आक्रोश करत ठिय्या मांडला आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून डीवायएसपी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम यांच्यासह डीबी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली असून मारहाणीचे मूळ कारण आणि जबाबदार व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पुढील तपास वेगाने सुरू आहे.
कराड बालसुधारगृहातील मारहाणीत मुलाचा मृत्यू; नातेवाइकांचा बालसुधारगृहासमोर ठिय्या
by Team Satara Today | published on : 13 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा