भारतीय महिला संघ बांगलादेशविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत खेळणार

नवी दिल्ली : कौशल्य आणि डावपेच याचा उत्कृष्ट संगम घडविणाऱ्या भारतीय महिला संघाने अ गटातील तिसऱ्या साखळी लढतीत मलेशिया संघाचा 100-20 असा 80 गुणांच्या फरकाने धुव्वा उडवताना खो खो जागतिक विश्वचषक स्पर्धेतील आपली अपराजित मालिका कायम राखली. उपांत्यपूर्व फेरीत याआधीच प्रवेश निश्चित केलेल्या भारतीय महिला संघाचा सामना बांगलादेश संघाशी सामना होणार आहे.

इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील १६ जानेवारीच्या सामन्यात भिलार पोपीनाबेन आणि मोनिका या बचाव पटूचया अफलातून कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने मलेशिया संघाचा एकतर्फी पराभव करून अ गटात सर्वोच्च स्थान प्राप्त केले. 

पहिल्याच सत्रात भारतीय बचाव पटूनी अप्रतिम कामगिरी करताना एकतर्फी विजयाची पायाभरणी केली होती. भिलार पोपिनाबेन आणि मोनिका यांनी 5मिनिटे 50सेकंद बचाव केल्यानंतर प्रियांका, नीतू आणि मिनू यांनी अखेर पर्यंत नाबाद राहताना पहिल्या सत्रा अखेर 6-6 अशी बरोबरी करून दिली.

दुसऱ्या सत्रात मलेशियाची पहिली तुकडी केवळ 27 सेकंदात गारद करणाऱ्या भारतीय महिलांनी मोनिका आणि निर्मला भाति यांच्या आक्रमणामुळे दुसऱ्या सत्राअखेर भारताला 44-6 अशी आघाडीमिळवून दिली. मलेशिया कडून एंग ईव्ही आणि लक्षिता विजयन यांचे प्रयत्न 1मिनिट 4सेकंदानी कमी पडले. 

तिसऱ्या सत्रात सुबश्री सिंग हीने 4 मिनिटे 42 सेकंद बचाव करताना भारतीय महिला संघाला 48-20 असे आघाडीवर नेले. चौथ्या सत्रात हीच घौड दौड कायम राखताना बचाव व आक्रमणाचा सुरेख संगम साधत भारतीय महिला संघाने 80गुणांच्या फरकाने विजयाची नोंद केली. 

सर्वोत्कृष्ट बचाव पटू: एंग ईव्ही

सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू: मोनिका

सामनावीर: रेश्मा राठोड

मागील बातमी
शाहरुखच्या मन्नत बंगल्यातही अज्ञाताकडून घुसखोरीचा प्रयत्न
पुढील बातमी
थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची सांगता

संबंधित बातम्या