सातारा : सातारा शहरांमध्ये असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया एपीटीआय या शिखर संस्थेच्या द्वारे दि. 7 मार्च रोजी महा अॅप्टिकॉन 2026 या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात सकाळी दहा वाजता करण्यात आले आहे .या सभेचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले व कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे या पाच जिल्ह्यातून तब्बल तेराशे फार्मसी प्राध्यापक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत .खासदार उदयनराजे भोसले व आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या भव्य परिषदेचे उद्घाटन होणार असून ए पी टी आय चे राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद उमेकर राज्याच्या अध्यक्ष डॉक्टर राकेश सोमाणी तसेच फार्मास्युटिकल असोसिएशनचे पदाधिकारी दिपेंद्र सिंग आणि विजय पाटील यांची सुद्धा यावेळी उपस्थिती असणार आहे .
या परिषदेमध्ये फार्मसी क्षेत्रामधील अध्यापन पद्धती , संशोधन तसेच भाषांतरित पद्धती , उद्योजकता , विकास स्टार्टअप कल्चर आणि एआयचा अध्यापनामध्ये वापरया पाच विषयांवर प्रमुख मार्गदर्शन केले जाणार आहे. ए आय पी टी ही औषध निर्माण शास्त्र शाखेतील शिखर संस्था असून गेल्या पाच वर्षापासून विद्यमान कार्यकारिणीने शिक्षक केंद्रित उपक्रमांना विशेष गती दिली आहे.
सर्वसमावेशकता व प्रादेशिक संतुलन राखण्याचा या समितीने प्रयत्न केला आहे. या कार्याचा गौरव म्हणून शाखेला बेस्ट ब्रांच अवॉर्ड 2023 असे राष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्राप्त झाले आहे. साताऱ्यात होणाऱ्या या संयोजन समितीचे सदस्य कृष्णा विद्यापीठाचे दिन डॉ. नामदेव जाधव फलटण एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विक्रम देशमुख, मसूरच्या दादासाहेब चव्हाण फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विक्रम शिंदे, यशोदा टेक्निकल कॅम्पस फार्मसी विभागाचे प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव आणि डॉ नागेश अलुरकर इत्यादी मान्यवर संयोजन समितीचे काम सांभाळत असून सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.