खिंडवाडीत जुन्या वादातून तरुणाला दगडाने मारहाण; सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 25 November 2026


सातारा : खिंडवाडी (ता. सातारा) येथे जुन्या वादाच्या कारणावरून एका 25 वर्षीय तरुणाला दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. यावेळी संबंधित तरुणाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी अजिंक्य डांगे (रा. कोडोली, ता. सातारा) याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत जालिंदर सूर्यवंशी (वय 25, रा. खिंडवाडी, ता. सातारा) हा 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खिंडवाडी येथील नवीन घराच्या बांधकामाच्या ठिकाणी गेला होता. त्यावेळी त्याचा ओळखीचा मित्र केदार पवार याच्याशी वाद झाला होता. या वादाच्या कारणावरून केदार पवार याचा मित्र अजिंक्य डांगे याने यशवंत याला हाक मारून बोलावले.
यशवंत तेथे गेल्यानंतर अजिंक्य याने हातातील दगडाने त्याच्या डोक्याच्या डाव्या बाजूस कानाच्या वर तसेच डाव्या हाताच्या कोपरावर मारहाण करून जखमी केले. त्यानंतर ’तुला लय मस्ती आली आहे का?’ असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच ’तुला बघून घेतो, सोडत नाही,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी यशवंत सूर्यवंशी याने दिलेल्या फिर्यादीवरून सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार कणसे तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्पवयीन मुलाच्या अपहरणप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा
पुढील बातमी
वाढे येथे वेण्णा नदीवरील पुलाच्या बांधकाम साईटवरून 2 लाखांचे साहित्य लंपास; सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संबंधित बातम्या