छत्रपती शिवाजी कॉलेजच्या इतिहास विभागाच्या वतीने सातारचे प्रतिसरकार स्मारक आणि हुतात्मा स्मारकाला अभिवादन

by Team Satara Today | published on : 05 August 2025


सातारा : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारचे घटक महाविद्यालय छत्रपती शिवाजी कॉलेजच्या इतिहास विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी दि. 2 ऑगस्ट रोजी सातारा प्रतिसरकार स्मारकाला भेट देऊन प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबवली.

या कार्यक्रमात सातारा प्रतिसरकार स्मारक समितीचे सचिव अस्लम तडसरकर, कोषाध्यक्ष विजय निकम, महात्मा गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजी राऊत, कार्यकारणी सदस्य विक्रांत पवार, स्वातंत्र्य सेनानी कॉम्रेड व्ही. एन. पाटील स्मारक समितीचे सहसचिव प्रमोद परमणे आणि सदस्य शंकर पाटील हे मान्यवर तसेच इतिहास विभागातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.

याप्रसंगी सातारा प्रतिसरकार स्मारक समितीचे सचिव अस्लम तडसरकर यांनी विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील 1942 ची चले जाव चळवळ आणि या चळवळीच्या दरम्यान भारतामध्ये तीन ठिकाणी निर्माण झालेले प्रतिसरकार यांची माहिती दिली. त्यापैकी सर्वाधिक काळ टिकलेले प्रतिसरकार म्हणून सातारा प्रतिसरकारची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात हुतात्म्यांनी बलिदान दिलेले आहे. म्हणून हे स्वातंत्र्य टिकवून ठेवणे आणि सर्वांच्या भल्यासाठी वापरणे याची विद्यार्थ्यांना त्यांनी जाणीव करून दिली.

स्मारक समितीच्या वतीने सातारा प्रतीसरकारचे प्रेरणास्थान असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील यांची प्रतिमा इतिहास विभागाला भेट दिली. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हुतात्मा स्मारकाला भेट देवून बलिदान व त्यागाची प्रेरणा घेतली. या प्रसंगी डॉ. दत्तात्रय कोरडे यांनी विद्यार्थ्यांना स्मारकाची माहिती दिली. यानंतर विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय येथे भेट दिली. वस्तू संग्रहालयाचे संचालक शिंदे यांनी विद्यार्थ्यांना वस्तुसंग्रहालयाचे महत्व, ऐतिहासिक वारसा आणि नोकरीच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले. इतिहासाची प्रेरणास्थळे आणि ज्ञानकेंद्रे असलेल्या या तिन्ही ठिकाणांना भेटी देऊन विद्यार्थ्यांनी इतिहासाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळविले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मनोमिलनाला आव्हान देणार तिसरी आघाडी
पुढील बातमी
कोल्हापूरच्या महादेवी साठी सातारा कॉंग्रेसचे निवेदन

संबंधित बातम्या