अपक्ष नगरसेवक सागर पावशे यांनी घेतली उदयनराजे यांची भेट; उदयनराजे यांनी पावशे यांना भरविला पेढा

by Team Satara Today | published on : 25 December 2025


सातारा  :  सातारा नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अपक्ष निवडून आलेले श्री.सागर पावशे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची पुणे येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी पावशे यांच्या पालिका निवडणूकीतील मोठ्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन करण्यात आले तसेच जनतेने दिलेल्या विश्वासाला न्याय देत शहराच्या विकासासाठी ते निष्ठेने व प्रभावीपणे कार्य करतील, अशा शुभेच्छा उदयनराजे यांनी दिल्या.

सातारा शहराच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन सकारात्मक आणि लोकाभिमुख काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त झाला. उदयनराजे यांनी सागर पावशे यांचे पेढा भरवून तोंड गोड केले. याप्रसंगी सातारा लोकसभा संयोजक श्री.सुनील काटकर, प्रतापगड प्राधिकरण समितीचे सदस्य श्री.काका धुमाळ, माजी उपनगराध्यक्ष श्री.रवी पवार, माजी नगरसेवक श्री.कल्याण राक्षे, श्री.विश्रांत कदम, श्री.अंकुश जाधव, श्री.राजेंद्र शेडगे व श्री.संदीप शेडगे उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच रिक्षाचालकांची मनमानी ; अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी करत असल्याची तक्रार
पुढील बातमी
नगराध्यक्ष अमोल मोहिते आज पदभार स्वीकारणार; दोन्ही राजे राहणार उपस्थित, उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक निवडीकडे लक्ष

संबंधित बातम्या