सातारा : जुगार प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निगडी तर्फ सातारा येथे जुगार प्रकरणी दस्तगीर यासीन मुलाणी (वय 68, रा. निगणी तर्फ सातारा) याच्या विरुध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 880 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.