सातारा : भरधाव दुचाकीच्या धडकेत पती-पत्नी जखमी झाल्याची घटना सातारा शहरात तालीम संघ येथे दि १८ रोजी घडली आहे. ही घटना पोवई नाका ते राजवाडा मार्गावरील तालीम संघ परिसरात लहुजी वस्तादांच्या पुतळ्यासमोर घडली. या प्रकरणी सागर दिनकर कदम (रा.वळसे,सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिजीत भोसले व त्यांची पत्नी सौ. सारिका भोसले (वय ४०) हे दोघे हिरो प्लेझर (क्र. एम.एच-११-बी.डब्लू-६४७१) या दुचाकीवरून सातारा येथील सेव्हन स्टार येथे चित्रपट पाहून घरी परतत होते. दरम्यान, तालीम संघ परिसरात आल्यानंतर समोरून आलेल्या एका भरधाव दुचाकीने त्यांच्या वाहनास जोरदार धडक दिली.
या अपघातानंतर परिसरात नागरिकांची गर्दी जमली. जखमी अवस्थेत असताना भोसले यांनी आपल्या भावाला (अमर हणमंत भोसले) यांना फोन करून घटनेची माहिती दिली. अमर भोसले यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन जखमींना खाजगी रिक्षाने सातारा येथील दत्तकाशी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेल्या दुचाकीचा क्रमांक (एम.एच-११-सीपी-६९८८) असा असून संबंधित चालकाने आपले नाव सागर दिनकर कदम (रा. वळसे, ता. जि. सातारा) असे सांगितल्याची माहिती जखमींनी दिली आहे.
या प्रकरणी पुढील तपास सुरू असून पोलीस हवालदार कारळे करत आहे.