सातारा : विवाहितेला जाचहाट केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात चारजणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. निखिल शांताराम चौधरी, वैशाली चौधरी, शांताराम चौधरी, रोहन चौधरी (सर्व रा.बिबवेवाडी, पुणे) यांच्या विरुध्द निहा निखिल चौधरी (सध्या रा. विकासनगर, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. घरगुती कारणातून जाचहाट केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही घटना मार्च 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत घडली आहे.