साताऱ्यात युवक व महिला प्रदेश काँग्रेसची सह्यांची मोहीम; व्होट चोरीचा निषेध करत सदस्यांनी केले आंदोलन

by Team Satara Today | published on : 13 October 2025


सातारा : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस व युवक काँग्रेस तर्फे “वोट चोर, गद्दी छोड” व सही मोहीम राबविण्यात आली .आज सातारा येथे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने संध्याताई  सव्वालाखे व शिवराज दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक प्रभावी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या सुषमा राजे घोरपडे, प्राची ताकतोडे, अनिता जाधव, अनिता भोसले, शोभा गोळे, धनश्री मालुसरे, अनिता मिरेकर, हजरा शिकलगार, सविता राठोड, प्रणती चव्हाण, शहनाज इनामदार, प्रिया चौगुले, तसेच अनिता जाधव उपस्थित होत्या.

या कार्यक्रमामध्ये सध्याचे सरकार वोट चोरी करून, जनादेशाचा अपमान करून सत्तेत बसलेले आहे, हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी " वोट चोर, गद्दी छोड” तसेच “सही मोहीम” राबविण्यात आली. या मोहिमेत सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला, आणि सध्याच्या सरकारविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.कार्यक्रमादरम्यान नागरिकांकडून सही (स्वाक्षऱ्या) गोळा करण्यात आल्या, ज्याद्वारे जनतेने या आंदोलनाला भक्कम पाठिंबा दर्शविला.या सही मोहिमेला जनतेचा उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

 मुलीवर झालेल्या बलात्कार आणि निर्घृण हत्येचा तीव्र निषेध

कार्यक्रमादरम्यान सातारा तालुक्यातील सासपडे गावात केवळ तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार आणि निर्घृण हत्येचा तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेने संपूर्ण समाज हादरून गेला असून, महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन नेमके काय करत आहे यावर संशय व्यक्त करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. महिला काँग्रेसने या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. महिला काँग्रेसच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये राजकीय जागरूकता, सामाजिक संवेदनशीलता आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी एकजुटीचा संदेश पसरविण्यात आला. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मातबरांचे पत्ते गुल तर अध्यक्षपदासाठी काहींना संधी; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाली जिल्हा परिषद आरक्षण सोडत
पुढील बातमी
कराड उत्तरमधील पाणंद रस्त्यांसाठी सव्वा सात कोटींचा निधी मंजूर; आ. मनोज घोरपडे यांची माहिती; ३० गावातील ४२ पाणंद रस्ते मंजूर

संबंधित बातम्या