सातारा शहर परिसरात राजकीय महिला पदाधिकाऱ्याचा विनयभंग; एका विरोधात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 27 March 2026


सातारा  : सातारा शहर परिसरात एका राष्ट्रीय पक्षाच्या कार्यालयामध्ये महिलेचा विनयभंग करण्यात आला असल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ३५ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिल्याने सातारा शहर पोलीस ठाण्यात एका विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपाळ लाहोटी असे गुन्हा दाखल झालेल्या संशयितांचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दिनांक ४ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. राष्ट्रीय पक्ष असलेल्या एका कार्यालयात जनता दरबार सुरू असताना एका गॅस एजन्सीमध्ये अकाउंटचे काम पाहणाऱ्या गोपाळ लाहोटी याने जनता दरबार येथे येत राष्ट्रीय पक्षाच्या सरचिटणीस असलेल्या फिर्यादी महिलेला बाहेर बोलावून घेतले. यावेळी तुम्ही आमच्या गॅस एजन्सीमध्ये यायचे नाही, तुमच्या घराचे हक्कसोडपत्र करून संपूर्ण घर नलिनी साळुंखे यांच्या नावावर करून द्या. नाहीतर तुम्हाला जीवे ठार मारून अशी धमकी दिली. यावेळी संशयिताने फिर्यादी महिलेचा डावा हात पकडून स्वतःकडे ओढून घेत पीरघळला. महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार गुरव करत आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुण्याच्या तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून साताऱ्यात अत्याचार : साताऱ्यातील तरुणावर गुन्हा
पुढील बातमी
शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर गर्दी जमवून मारामारी करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा

संबंधित बातम्या