बेंगळुरू : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये मालिका सुरु आहे, आज या मालिकेची पहिली इनिंग समाप्त झाली आहे. भारताच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये निराशाजनक कामगिरी केली. भारताचा संघ पहिल्या इनिंगमध्ये ४६ धावा करून संपूर्ण संघ बाद झाला. आता नुकतीच न्यूझीलंडचा संपूर्ण संघ बाद झाला आहे आणि यामध्ये न्यूझीलंडच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये ४०२ धावा केल्या आहेत. सध्या न्यूझीलंडच्या संघाकडे ३५६ धावांची आघाडी आहे. आता भारतीय संघाची दुसऱ्या इनिंगची फलंदाजी सुरु झाली आहे. यामध्ये भारताच्या संघाला सर्वात मोठी धावसंख्या उभी करावी लागणार आहे तरच टीम इंडिया या सामन्यामध्ये विजय मिळवू शकते.
भारताच्या संघाला आधी ३५६ धावा कराव्या लागतील त्यानंतर टीम इंडियाला ३०० ते ४०० धावांचे लक्ष्य उभे करावे लागणार आहे कारण दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी सुद्धा मजबूत आहे. न्यूझीलंड संघाच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर डेव्हॉन कॉन्वे, रचिन रवींद्र, टीम साऊथीने संघासाठी मोठी खेळी खेळली. डेव्हॉन कॉन्वेने १०५ चेंडूंमध्ये ९१ धावा केल्या, तर रचिन रवींद्रने १५७ चेंडूंमध्ये १३४ धावा केल्या आणि ७३ चेंडूंमध्ये ६५ धावा केल्या त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाला मोठी धावसंख्या उभी करण्यात यश मिळाले.
भारतीय संघाची गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर कुलदीप यादवने संघासाठी ३ विकेट्स नावावर केले. त्याचबरोबर भारताचा अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाने न्यूझीलंडच्या तीन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या हाती २ विकेट्स लागले. तर रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी एक विकेट नावावर केला आहे.
भारतीय संघाविरुद्ध पहिल्यांदाच न्यूझीलंडच्या संघाने ३५६ अशा मोठ्या धावसंख्येची आघाडी घेतली आहे. किवी संघाने तिसऱ्या दिवशी आपली धावसंख्या १८०/३ पर्यंत वाढवली. दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर काही षटकांनी मोहम्मद सिराजने डॅरिल मिशेलला बाद केले. त्यानंतर नियमित अंतराने विकेट पडत गेल्या, त्यामुळे न्यूझीलंडची धावसंख्या ७ विकेटवर २३३ धावा झाली. रचिन रवींद्रने १२४ चेंडूत शतक पूर्ण केले आणि टीम सौदीसोबत १३७ धावांची उत्कृष्ट भागीदारी केली. रवींद्र आणि सौदीने मिळून संघाची धावसंख्या ३५० धावांच्या पुढे नेली.
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |
कोळेवाडी ग्रामसभेत मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा ठराव |
सर्वांना बरोबर घेऊन मलकापूरचा विकास करणार : आ. डॉ. अतुलबाबा भोसले |