साहित्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज नगरी : मातृभाषा मराठीला केवळ अभिजात दर्जा देऊन थांबता येणार नाही मराठीला राष्ट्रीय पातळीवर लोकव्यापी मान्यता मिळवायची आहे .अभिजात भाषा हा लढ्याचा पहिला टप्पा होता आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे .महाराष्ट्रामध्ये मातृभाषा ही सक्तीचीच आहे,याबाबत नरेंद्र जाधव समिती स्थापन करण्यात आले असून त्यांचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे .या समितीचा अहवाल संपूर्ण मराठी भाषिकांना अवगत करून तो लवकरच लागू केला जाईल असे स्पष्ट अभिवचन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले .एकीकडे परदेशी भाषांसाठी पायघड्या घातल्या जात असताना दुसरीकडे आपण प्रादेशिक भाषांच्या संलग्नतेचा आकस का ठेवतो आहोतअसा सवाल मुख्यमंत्र्यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून उपस्थित केला
श्रीमंत छत्रपती थोरले शाहू महाराज नगरीतून 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी,संमेलनाचे स्वागत अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे ,कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे,महाराष्ट्र साहित्य परिषद संयोजन समितीचे कार्याध्यक्ष व अखिल भारतीय मराठी महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी,कार्यवाह सुनिता राजे पवार ,अखिल भारतीय 99 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पानिपतकार विश्वास पाटील, 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर,संमेलनाच्या उद्घाटिका ज्येष्ठ साहित्यिका मृदुला गर्ग ,साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी,मसाप शाहूपुरी शाखा साताराचे अध्यक्ष नंदकुमार सावंत,मावळा फाउंडेशन चे अध्यक्ष एड. शरद बेबले, इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
फडणवीस पुढे म्हणाले, साहित्य क्षेत्रामध्ये एका अध्यक्षाकडून दुसऱ्या अध्यक्षाकडे कार्यभार दिला जातो ही अत्यंत चांगली गोष्ट आहे असे पांडे राजकारणात पडले तर फार बरे होईल सर्व सारस्वतांना मी व्यासपीठावरून प्रणाम करतो साताऱ्यामध्ये संगम परंपरा आधुनिकतेचा इतिहास आणिवर्तमानाची दृष्टी या सर्वच बाबी येथे आढळून येतात साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे वारणा काठचे असून त्यांना कार्यभार देणाऱ्या मावळत्या अध्यक्ष ताराभावळकर या कृष्णाकाठच्या आहेत .कृष्णा व कोयनेच्या परंपरांचा संगम या साहित्य संमेलनामध्ये दिसून येत आहे ऐतिहासिक काळापासून साताऱ्याच्या साहित्य संमेलनाशी संबंध असून त्याला ऐतिहासिक अधिरचना आहे सातारा जिल्ह्याने 17 संमेलन अध्यक्ष दिले असून साताऱ्यात आतापर्यंत सहा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने झाली आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला विचारांचे स्वातंत्र्य करण्याचे अधिकार दिले आहेत हे संविधान मजबूत असून त्यामध्ये कोणताही बदल होणार असल्याच्या केवळ वावड्या उठवल्या जात आहेत .मराठी भाषेला केवळ अभिजात दर्जा देऊन थांबता येणार नाही तर मराठीला देश व्यापी आणि लोकव्यापी मान्यता मिळवायची आहे यापुढे मराठी भाषेचा अभिजात दर्जावाढवण्याच्या दृष्टीने आणि टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने साहित्यामध्ये वेगवेगळे प्रयोग होणे गरजेचे आहे .परस्पर विरोधी विचार सुद्धा साहित्य सत्संगामध्ये महत्त्वाचे असतात अनेक चांगल्या विचारांचा संगम येथे पाहायला मिळतो अशी साहित्य संमेलने ही समाजासाठी दिशादर्शक असतात .मराठी भाषा ही महाराष्ट्रात सक्तीचीच आहे अन्य भाषांच्या अध्ययनासंदर्भात योग्य ते धोरण लवकरच ठरवले जाईल .यासंदर्भात डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून साहित्य वांग्मय यांच्याशी चर्चा करून या समितीने दिलेला अहवाल आता अंतिम टप्प्यात आहे हा अहवाल राज्य शासनाकडे लवकरच सादर होऊन तो संपूर्ण मराठी भाषिकांसाठी सुद्धा खुला केला जाईल .त्यानंतर मराठी भाषेच्या संदर्भातील आणि प्रादेशिक भाषा च्या सक्ती संदर्भात योग्य ते धोरण लागू केले जाईल असे आश्वासन फडणवीस यांनी दिले .एकीकडे परदेशी भाषा शिकण्याचा अट्टाहास आणि त्याचे स्वागत होत असताना दुसरीकडे प्रादेशिक भाषांचा आकस का ठेवला जात आहे याकडे सुद्धा आपण लक्ष दिले पाहिजे असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला .मराठी भाषा ही जोडणारी असून बहुआयामी साहित्याने ती वैविध्यपूर्ण झाली आहे मराठी भाषा ही मानवी मूल्यांची भाषा आहे मराठीचा स्वाभिमान छत्रपतींनी व्यवहार कोश अस्तित्वात आणून शिकवला समाजाला दिशा देण्यासाठी साहित्याची निर्मिती आणि प्रत्येक साहित्य संमेलन हे दिशादर्शक असते .साहित्यिक क्षेत्रांमध्ये राजकारण यांनी हस्तक्षेप करण्याचे काही कारण नाही जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे तोपर्यंत साहित्य क्षेत्रात कोणताही हस्तक्षेप होणार नाही मात्र साहित्यिकांनी साहित्य क्षेत्र हे खुलेपणाने चालवा व त्यामध्ये राजकारण आणू नये असे आवाहन त्यांनी केले .
अखिल भारतीय मराठी महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी आपल्या मनोगतात म्हणाले जुन्यातलं नवं आणि नव्यातील नवअशा पद्धतीने अखिल भारतीय मराठी महामंडळ वाटचाल करते आहे साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे स्वायत्त असते . राजकारणी व साहित्यिक यांनी आपापल्या सीमारेषा ओळखाव्यात असे आवाहन त्यांनी केले .यामध्ये जर हस्तक्षेप झाला तर साहित्यिकांना आपला कणखरपणा दाखवावा लागेल .कोणीही यावे आणि टपली मारून जावे अशी स्थिती नाही इंग्रजी सह इतर प्रादेशिक भाषांची सक्ती होत असून त्याला साहित्यिकांचा विरोध आहे मराठी भाषा ही महाराष्ट्रात का सक्तीची आहे याबाबतचा लोक आग्रह समजून घ्यावा लागेल माय मराठी ची अवहेलना सुरू असताना मावशीचे कोड कौतुक सहन केले जाणार नाही हिंदी शक्ती आपल्याला मागे घ्यावी लागेल असे मिलिंद जोशी स्पष्टपणे म्हणाले प्रादेशिक भाषा शिकण्याला विरोध नाही तर ती शक्तीने शिकवण्याला आमचा विरोध आहे हिंदी व अन्य भाषांची शक्ती आपण तात्काळ रद्द करावी आणि त्याचे श्रेय सुद्धा आपण घ्यावे अशी विनंती मिलिंद जोशी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केली. महाराष्ट्रात ग्रंथालयाची अवस्था बिकट आहे गावातील ग्रंथालय समृद्ध करा ,एकीकडे मराठी भाषा अभिजात होत असताना दुसरीकडे ग्रंथालय सेवकांचे अल्प मानधन अथवा वेतन हे वैचारिक दिवाळखोरी आहे .याचबरोबर महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या सीमा वादात होरपळलेल्या सीमा भागातील 865 गावांमधील 25 लाख लोक आजही मराठीवर प्रेम करतात यासंदर्भातील न्यायालयीन लढाई मुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून गती द्यावी असे आवाहन मिलिंद जोशी यांनी केले .
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पानिपतकार विश्वास पाटील म्हणाले तुमच्यासमोर उभा असलेला हा पाटील साहित्याच्या फळांमध्ये रमतो बिघडलेल्या डावांसाठी पाटील आणि कुलकर्णी यांची युती होणे गरजेचे आहे 2009 मध्येमहाबळेश्वर मध्ये झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर आनंद यादव मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांची आठवण यानिमित्ताने काढणे गरजेचे आहे .या सर्वच साहित्यिकांनी माझ्या वैचारिक आणि वांग्मयीन मांडणीचा परिपोष केला आहे सातारा हा साहित्यिक आणि सांस्कृतिक विचाराला दिशा देणारा जिल्हा आहे साहित्य संमेलने ही समाजाला दिशा देणारी साहित्य केंद्र असतात आमची विचार संहिता ही कित्येक पिढ्यांची स्फुल्लिंगे चेतवते. सातारामध्ये शासकीय सेवेमध्ये असताना पानिपतच्या महासंग्रामाचा आशय सुचला आणि त्यात साताऱ्यामध्ये आज संमेलनाच्या व्यासपीठावर अध्यक्ष या नात्याने मी उभा आहे यासारखा दुग्ध शर्करा योग नाही .महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात हे सरकारचे अपयश नाही तर समाज व्यवस्थेचे सुद्धा अपयश आहे तसेच साहित्यिकांनी सुद्धा याची ठळकपणे जबाबदारी घेतली पाहिजे शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे .लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यातील योगदान हिमालया एवढे आहे त्यामुळे त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळाला पाहिजे अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांमध्ये मराठी भाषेवर होणारी अतिक्रमणे ही भयंकर आहेत महाराष्ट्रातील मराठी शाळा या बंद पडता कामा नयेत .कर्नाटक राज्य जर एका विद्यार्थ्यासाठी मातृभाषा शिकवणाऱ्या शाळा चालवते मग महाराष्ट्र सरकार ते का करू शकत नाही प्रत्येक रेल्वे स्टॅन्ड एसटी स्टँड तसेच जिल्हा प्रशासन कार्यालयामध्ये मराठी साहित्याची केंद्रीय असावीत आणि तेथे मराठी भाषेची पुस्तके तेथील प्रयोग त्याची मांडणी हे माफक दरामध्ये मराठी भाषिकांना उपलब्ध झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .मुंबई महाराष्ट्राला त्यागातून वेदनेने मिळालेली आहे तेथे होणारी राजकीय आणि साहित्यिक अतिक्रमणे याकडे सत्ताधाऱ्यांनी निश्चित लक्ष द्यायला हवे .मराठी ही आमच्या ललाटी आहे आणि त्याचाआम्हाला अभिमान आहे असे विश्वास पाटील यांनी ठामपणे सांगितले
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी संमेलन अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या दिल्ली येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे मला मिळालेले अध्यक्षपद हा अपघात होता मात्र त्यासाठी मी मराठी भाषिकांची कृतज्ञ आहे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पुढील अध्यक्ष विश्वास पाटील हे कृतिशील काम करतील मराठी भाषेच्या अभिजाततेचा मला मनापासून आनंद आहे .लहान मुलांवर मात्र अनेक भाषांचा दडपण येऊ नये त्यासाठी मराठी भाषाच केवळ सक्तीची केली पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला जीवनाच्या उत्तरायणात महाराष्ट्राने माझ्याकडे खूपच लक्ष दिले निवड झाल्यानंतर कोणीही राजकीय प्रतिनिधी मला भेटावयास आला नाही मात्र समाजाच्या अनेक स्तरांमधून मला अभिनंदनचा तसेच सक्रिय पाठिंबा मिळाला साहित्य संस्कृतीमध्ये ग्रंथालयांचा फार मोठा सहभाग आहे आपल्याला प्रादेशिक भाषा आणि मातृभाषा यांच्यामध्ये संलग्नतेचा सांस्कृतिक पूल बांधावयाचा आहे. समाजाला दिशा देणारी साहित्य निर्मिती आणि त्या साहित्य निर्मितीचा जागर करणारी साहित्य संमेलने होणे अत्यंत आवश्यक आहे.