सातारा : जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात समुपदेशाने 243 जणांना नियुक्ती देण्यात आली. आरोग्य सेवक पुरुष 40 टक्के आणि आरोग्य सेविका या संवर्गात या नियुक्त्या झाल्या आहेत.
सातारा जिल्हा परिषदेतील 21 संवर्गात 972 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी गेल्यावर्षी परीक्षा झाली होती. यामधील पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात येत आहे. सोमवारी आरोग्य विभागातील कर्मचार्यांना नियुक्ती मिळाली. जिल्हा परिषदेतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात समुपदेशाने ही प्रक्रिया पार पडली. आरोग्य सेवक पुरुष 40 टक्के या संवर्गात 74 जणांना, तर आरोग्य सेविका म्हणून पात्र 169 जणींना नियुक्ती देण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेत आतापर्यंत 18 संवर्गात पात्र व्यक्तींना नियुक्ती देण्यात आलेली आहे.