सातारा : कर्तव्य सोशल ग्रुप आणि साधु वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २६ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या कालावधीत मोफत कृत्रिम हात व पाय (जयपूर फूट) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. छ. शाहू अकॅडमी, पुष्कर मंगल कार्यालयाच्या पाठीमागे विसावा नाका सातारा येथे होणाऱ्या या शिबिरात कृत्रिम हात व पाय पूर्णपणे मोफत दिले जाणार असून या शिबिराचा लाभ गरजू दिव्यांगांनी घ्यावा, असे आवाहन कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले आहे.
या शिबिरादिवशी दिव्यांगांच्या हात व पायाची मापे घेतली जाणार असून सुमारे ३० दिवसानंतर संबंधितांना कृत्रिम अवयव वाटप केले जाणार आहे. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांग बंधू आणि भगिनींनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी दिलावर पत्रेवाले ९३७२१७८२११, संदीप भणगे ९८२२१८९७८७, चंदन घोडके ९८८१८९६०१४, महेश यादव ७०५८०५४४१८, दीपक भोसले ९४२१११९४१९, महेंद्र गार्डे ९८२२६२७९०९, सुहास वहाळकर ९४२०७७२७७३, विजय देशमुख ९४२३०३२०७५, विलास कासार ९८५०६०९४२४, जितेंद्र मोहिते ९५०३२७२४५३ यांच्याशी संपर्क साधावा.