गोडोलीतील कामाठीपुरा परिसरात मारहाण, विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 31 August 2026


सातारा : गोडोलीतील कामाठीपुरा परिसरात घरासमोर येऊन एका महिलेचा विनयभंग तसेच मारहाण केल्याप्रकरणी महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, अजीम अल्लाउद्दीन मुलाणी (रा. कामाठीपुरा, गोडोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी रात्री फिर्यादीच्या घरासमोर आला. त्याने महिलेच्या वडिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत कुटुंबीयांना धमकी दिली. त्यानंतर महिलेशी असभ्य वर्तन करीत विनयभंग केल्याचा आरोप आहे. तसेच महिला व तिच्या भावाला शिवीगाळ करून मारहाण केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अवैध दारूविक्री प्रकरणी सातारा तालुका पोलिसांचे मालगाव व परळी परिसरात छापे
पुढील बातमी
आझादनगर परिसरातील घराच्या पार्किंगमधून बुलेटची चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

संबंधित बातम्या