राखीचे पाकीटे स्वीकारण्‍यासाठी पोस्ट ऑफीसमध्ये स्वतंत्र यंत्रणा

पोस्ट ऑफीसचे 4 ऑगस्ट रोजी व्यवहार राहणार बंद

by Team Satara Today | published on : 29 July 2025


सातारा : भारतातील सर्व ठिकाणी राखी पाकिटांचे वितरण लवकरात लवकर होण्यासाठी सातारा टपाल विभागातर्फे राखी पाकिटे स्वीकारण्यासाठी खास स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये सातारा मुख्य डाकघर, सातारा सिटी, एम. आय. डी. सी. सातारा, संगमनगर, वाई, कोरेगाव, लोणंद, महाबळेश्वर, फलटण, पांचगणी या पोस्ट ऑफिस व्यतिरिक्त इतर ही ठिकाणी सदर राखी पाकिटे स्वीकारण्याची व्यवस्था केलेली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन वरिष्ठ अधिक्षक डाकघर यांनी केले आहे.

नागरिकांनी राखी पाकिटे ऑफिस मध्ये व्यवस्था केलेल्या पत्र पेट्या / ट्रे मध्ये टाकावी किंवा टपाल कर्मचारी यांच्याकडे द्यावीत. तसेच राखी साठी पोस्ट ऑफिसने तयार केलेल्या विशिष्ट कव्हरचाही उपयोग करावा व जलद गतीने पाठवण्यासाठी  स्पीड पोस्ट सेवेचाही वापर करावा.

 काही अडचण असल्यास पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी. त्यामुळे आपली राखी पाकिटे लवकरात लवकर वितरण करता येतील.  राखी पाकिटे स्वीकारणाऱ्याचा पत्ता पिनकोड व मोबाइल क्रमांकासह   लिहावा. जेणेकरून राखी पाकिटांचे लवकरात लवकर वितरण होईल.

पोस्ट ऑफीसचे 4 ऑगस्ट रोजी व्यवहार बंद राहणार :

सातारा : प्रगत डिजिटल प्लॅटफॉर्मकडे सुरळीत आणि सुरक्षित संक्रमण सुनिश्चित करण्यासाठी ४ ऑगस्ट २०२५ रोजी नियोजित डाऊनटाईम ठेवण्यात आले आहे. या दिवशी कोणतेही पोस्टल व्यवहार पोस्ट ऑफिसमध्ये होणार नाहीत, अशी माहिती वरिष्ठ अधिक्षक डाकघर यांनी दिली आहे.

एटीपी अॅप्लिकेशनचा उद्देश सुधारित वापरकर्ता अनुभव, जलद सेवा वितरण आणि अधिक ग्राहक-स्नेही इंटरफेस प्रदान करणे आहे, जो अधिक स्मार्ट, कार्यक्षम आणि भविष्यातील डाकसेवा देण्याच्या  भाग आहे. तरी ग्राहकांनी आपल्या भेटीचे पूर्वनियोजन करावे, असे आवानही करण्यात आले आहे.  


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर वाहतूक सुरु
पुढील बातमी
दूध उत्पादकांना मिळेना अनुदान

संबंधित बातम्या