सातारा : वनवासवाडी येथून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दोन लाखांच्या मुद्देमालाची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वनवासवाडी ता.सातारा येथून अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 85 हजार रुपये किंमतीचे 30 लोखंडी अँगल तसेच सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर मुद्देमाल चोरुन नेला. याशिवाय चोरट्यांनी अँगल वाकवून 25 हजार रुपयांचे नुकसान केले. याप्रकरणी गौरव सतिश काटकर (वय 25, रा. मुंबई) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
वनवासवाडी येथून सुमारे दोन लाखांच्या मुद्देमालाची चोरी
by Team Satara Today | published on : 03 April 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी जेसीबी चालकावर गुन्हा
September 23, 2026
मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा
September 23, 2026
अंत्यविधीसाठी येणाऱ्यांना मिळणार स्वच्छ, सुसज्ज सुविधा
September 22, 2026