सातारा येथे दि. १८ रोजी दलित महासंघातर्फे प्रबोधन मेळावा व सन्मान सोहळ्याचे आयोजन; संस्थापक उमेश चव्हाण यांची माहिती

by Team Satara Today | published on : 15 April 2026


सातारा : दलित महासंघ, अण्णाभाऊ साठे कृती समिती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथील हॉटेल पर्ल येथे दि. १८ रोजी भव्य प्रबोधन मेळावा व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती दलित महासंघाचे संस्थापक उमेश चव्हाण यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित या मेळाव्यात त्यांच्या विचारांचा जागर प्रसार करून समाजात जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. उपेक्षित व वंचित घटकांसाठी डॉ. आंबेडकर यांनी दिलेला लढा, त्याग आणि संघर्ष यांचा गौरव करण्यात येणार असून, त्यांच्या विचारांवर आधारित प्रबोधनपर मार्गदर्शनही होणार आहे.

या सन्मान सोहळ्यात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राहुल जाधव, डॉ. देवेंद्र पाटील, डॉ. अनुराधा सकट, डॉ. सुभाष कदम, डॉ. रामचंद्र जाधव, डॉ. चंद्रकांत काटकर, डॉ. उल्का झेंडे, डॉ. सुधीर कदम, डॉ. सुजय सकट यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे.

तसेच ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप, पत्रकार गुरुनाथ जाधव, विनोद नेवसे, प्रकाश वायदंडे, विशाल गुजर, विश्वास शेडगे, सुर्यप्रताप कांबळे, राजाराम पवार आदी पत्रकारांचाही सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय पोलीस निरीक्षक निलेश तांबे, रहिमतपूरचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे तसेच इतर मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमास विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित राहणार असून, मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात मनसेची संघटन बांधणीवर भर; संपर्क अध्यक्ष गणेश सातपुते, वरणजीत शिरोळे यांनी घेतला जिल्ह्यातील संघटनात्मक स्थितीचा आढावा
पुढील बातमी
साताऱ्यात रविवार पेठेत महापुरुषांची संयुक्त जयंती उत्साहात; अंधश्रद्धेला बळी न पडण्याचा महिलांचा निर्धार

संबंधित बातम्या