मा. खा. लक्ष्मणराव पाटील यांची साताऱ्यात राष्ट्रवादी कार्यालयात जयंती साजरी....

by Team Satara Today | published on : 25 February 2025


सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर सर्वप्रथम सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणारे लोकनेते माजी खासदार लक्ष्मणराव तात्या पाटील यांची ८७ वी जयंती सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन कार्यालयात साजरी करण्यात आली. मा. खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विविध आठवणींना उजाळा देण्यात आला.

लोकनेते लक्ष्मणराव पाटील यांनी पक्षाच्या ध्येय धोरणासोबतच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वातंत्र्य सैनिक किसनवीर आबा व ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे काम शेवटच्या श्वासापर्यंत जपले होते. स्पष्टवक्तेपणा व सहकार चळवळीत नेतृत्व करताना जिद्द, मेहनत, सचोटी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे घेतलेले निर्णय यामुळे बोपेगाव सरपंच ते संसद सदस्य अशी त्यांनी गुणवत्तेच्या निकषावर मजल मारली होती. 

सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद भूषवताना बहुजन समाजातील मुलांना नोकरी व जिल्हा बँकेच्या माध्यमातून व्यवसायासाठी त्यांना चालना दिल्यामुळेच आज बहुजन समाजातील मुलं सुद्धा उद्योग व्यवसायामध्ये स्वतःच अस्तित्व निर्माण करत आहेत. ही माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांची किमया आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिलेदार शिवाजीराव महाडिक, किरण साबळे-पाटील, श्रीनिवास शिंदे सपना राजेशिर्के, स्मिता देशमुख, सुनिता भोसले, अजिंक्य कदम, संजय पाटील, अजित जगताप, सागर भिसे विजयकुमार जाधव तुषार जाधव, राजेश घाडगे, अथर्व निकम-पाटील, आकाश मोहिते, आबासाहेब माने, भास्कर महाडिक, गणेश किर्दत, सुनील चव्हाण, प्रकाश जाधव, आनंद कासट, सचिन घाडगे यांच्यासह अनेकांनी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या कार्याची नव्या पिढीला आठवण करून दिली. दरम्यान, त्यांच्या मूळ गावी बोपेगाव तालुका वाई या ठिकाणी अनेक मान्यवरांनी माजी खासदार पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दिवसातून दोनदा घरचीच संजीवनी बूटी चावा
पुढील बातमी
नटराज मंदिरात महाशिवरात्री निमित्त रात्रभर जागरण कार्यक्रमाचे आयोजन

संबंधित बातम्या