सातारा : मुंबई-सेंट्रल ते कोरेगाव जाणाऱ्या एसटी बसमधून प्रवास करताना शेजारी बसलेल्या प्रवाशाने ३२ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी हितेश मनोहर सुर्वे (वय ४५, रा. नांदगाव, ता. कराड) याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १४ ऑक्टोबर रोजी रात्री ७.२५ ते ८.२० या वेळेत शिरवळ (ता. खंडाळा) ते वाढे फाटा आणि सातारा एसटी स्थानकादरम्यान हा प्रकार घडल्याची तक्रार संबंधित महिलेने दिली आहे. या तक्रारीनुसार, १५ ऑक्टोबर रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार बोडरे करीत आहेत.
एसटी बसमधील प्रवासात महिलेचा विनयभंग; मुंबई सेंट्रल-कोरेगाव बसमधील प्रकार
by Team Satara Today | published on : 15 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा