सातारा : विकासनगर येथे अज्ञात चोरट्यांनी 65 हजारांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, न्यू विकासनगर, सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी घरातून 65 हजार 301 रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज लंपास केला. सोन्याचे मणी, सोन्याचा कांचन वेल, सोन्याचे वेढणे याचा समावेश आहे. ही चोरीची घटना दि. 13 जून ते 28 जून या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी दिलीप वामन भोसले (वय 70, रा. न्यू विकासनगर, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.