ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन कार्यालयाचे आवाहन

by Team Satara Today | published on : 04 December 2024


सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे लष्कर पाणी पुरवठा केंद्रामार्फत पुरवठा होणाऱ्या ग्राहकांकडे 5 हजार किंवा त्यापेक्षा जास्त पाणी  देयक थबाकी आहेत, अशा सर्व ग्रहाकांनी पाणी देयके 15 डिसेंबर पर्यंत भरावीत, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन उपविभाग क्र. 1 चे उपविभागीय अभियंता यांनी केले आहे.

थकबाकी भरणार नाहीत अशा ग्राहकांची नळजोडणी बंद करण्याची कार्यवाही 16 डिसेंबर पासून सुरु करण्यात येणार आहे.  तसेच अवैधरित्या (प्राधिकरणाची मंजूरी न घेता) नळजोडणी करुन घेतली आहे अशांनी प्राधिकरण कार्यालयात त्वरीत संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व डिपॉझिट भरुन अवैध नळजोडणी वैध करुन घ्यावी, असेही प्राधिकरणाकडून कळविण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव
पुढील बातमी
अतुल कुलकर्णीची हिंदी वेबसीरिज 'बंदीश बँडीट्स 2'चा ट्रेलर रिलीज

संबंधित बातम्या