शिव आरोग्य सेनेच्यावतीने माउलींच्या सोहळ्यात फलटण येथे वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी; अनेक वारकऱ्यांनी घेतला लाभ

by Team Satara Today | published on : 18 July 2026


सातारा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संलग्न शिव आरोग्य सेनेच्यावतीने  दि.17 जुलै 2026 रोजी फलटण येथे पंढरपूरला वारीसाठी जाणाऱ्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आगमन सोहळ्याच्या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

या शिबिराचा लाभ अनेक वारकऱ्यांनी घेतला यामध्ये थंडी,ताप, खोकला, पाय दुखी अंगदुखी, जखम, पोटदुखी, जुलाब, सर्दी अशा प्रकारच्या वारकऱ्यांना उद्भवणाऱ्या विविध शारीरिक समस्यांवर तज्ञ डॉक्टर आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका यांच्या मदतीने तपासणी करून आवश्यक औषधे मोफत वाटण्यात आली.

सकाळी नऊ वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा मोफत आरोग्य सेवा कॅम्प सुरू होता. या शिबिराला उपस्थित शिव आरोग्य सेनेचे पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी डॉक्टर्स तसे आरोग्य सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी शिव आरोग्य सेनेचे जिल्हाप्रमुख  निमिश शहा, आरोग्य सेनेचे सचिव (माण,फलटण,खटाव)  शैलेंद्र नलवडे, फलटण शहर समन्वयक अंकुश पवार, सातारा शहर समन्वयक  मारुती वाघमारे, सातारा शिवसेना शहर प्रमुख  प्रणव सावंत, ग्राहक संरक्षण कक्ष शैलेश बोडके, नंदकुमार काकडे, अभिजीत कदम, आनंद कदम, यशपाल यादव, प्रथमेश गायकवाड, अजय शिंदे, हणमंत बासर, ओंकार काळे,अनिकेत गुंजवटे,प्रणव कदम, ऋषिकेश कुंभार, युगांक मुळीक,युवा सेना मोहित शहा, सोळशी देवस्थान सेवक धर्मेंद्र शहा यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

 या शिबिरास आळंदी देवस्थानचे प्रमुख ट्रस्टी  आत्माराम शास्त्री महाराज, प्रसिद्ध आर्थोपेडिक सर्जन डॉ. प्रसाद जोशी, प्रसिद्ध श्री जे टी पोळ यांची उपस्थिती लाभली तसेच फलटण तालुका मेडिकल असोसिएशन, निकोप हॉस्पिटल, जोशी हॉस्पिटल, क्रांतीसुर्य प्रतिष्ठान या सर्वांचे या शिबिरास सहकार्य लाभले. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कास रस्त्यावरील अपघातप्रकरणी कार चालकावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा
पुढील बातमी
महाबळेश्वर-मेढा मुख्य रस्त्यावर माचुतर गावाच्या हद्दीत एसटी-दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

संबंधित बातम्या