मुंबई : महायुती सरकार स्थापन झाल्यापासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याच्या चर्चा आहे. फडणवीस सरकारचे अनेक निर्णय आहेत ज्याचा थेट संबंध एकनाथ शिंदे यांच्याशी आहेत. फडणवीस सरकारने घेतलेले अनेक निर्णय एकनाथ शिंदे यांना धक्का मानला जात आहे. असाच आणखी एक निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे.
एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अजय अशर यांना महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच मित्र संस्थेच्या नियमित मंडळावरून हटवले आहे. दिलीप वळसे पाटील, राणा जगजितसिंग पाटील, राजेश क्षीरसागर यांची नव्याने निवड उपाध्यक्ष पदावर करण्यात आली आहे.
यासह मुख्य सचिव यांसह इतर महत्वाचे सिंचन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अजय अशर हे या मित्र संचालक पद समितीत होते. आता पदावरून हटवले आहे.