साताऱ्यात सामूहिक दीप प्रज्वलन करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

by Team Satara Today | published on : 17 September 2026


सातारा : सेवेला साधना मानणारे  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त साताऱ्यात आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी सामूहिक प्रज्वलन करून मोदीजींच्या सेवा कार्याला अभिवादन करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  रविंद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार, खासदार उदयनराजे भोसले, नामदार  शिवेंद्रसिंहराजे भोसले , सातारा जिल्हाध्यक्ष आमदारअतुल बाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बूथवरील प्रत्येक घरांमध्ये आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित करून  मोदीजींच्या सेवेला नमन करण्यात आले.
सातारा शहरातील पोवई नाका परिसरातील  श्री शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला नमन करून त्या ठिकाणी सामूहिक दीप प्रज्वलन करण्यात आले. त्याचबरोबर, स्व. अटल बिहारी वाजपेयी पथ, पोवई नाका ते वाडे फाटा रस्ता येथे सुद्धा सामूहिक दीप प्रज्वलन करून नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सातारा नगरपालिका नगरध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष  दत्तात्रय बनकर, लोकसभा समन्वयक सुनीलतात्या काटकर, विधानसभा प्रमुख अविनाश कदम, सतरा पंचायत समिती सभापती महेश गाडे, सातारा नगरपालिका सभापती धनंजय जांभळे, अशोक शेडगे, शंकर किर्दत, भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल चिकणे,बाह्य मंडल अध्यक्ष वैशाली टंगसाळे, मध्य मंडल अध्यक्ष अविनाश खर्शीकर,  नगरसेवक,  नगरसेविका,  भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वारंवारची शिस्तभंग अन् कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी साताऱ्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे निलंबित

संबंधित बातम्या