जी.डी.सी.अॅण्ड ए. व सी.एच.एम. परीक्षा २३, २४ व २५ मे रोजी

by Team Satara Today | published on : 26 February 2025


सातारा :   सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळाकडून (जी.डी.सी.अॅण्ड ए. बोर्ड) घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी.अॅण्ड ए.) परीक्षा-२०२५ व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम) परीक्षा-२०२५, दिनांक २३, २४ व २५ मे, २०२५ रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांनी दिली आहे.

जी.डी.सी. अॅण्ड ए. व सी. एच. एम. परीक्षा 2025 साठी https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि.7 मार्च , रात्री 8  वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच बँकेमध्ये चलनाने भरणा करण्याची मुदत दि. १३ मार्च रोजी बँकेच्या कामकाजाच्या वेळेपर्यंत करण्यात आलेली आहे, असेही सुद्रिक यांनी कळविले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उंचावरून पडल्याने मुलाचा मृत्यू
पुढील बातमी
मराठी भाषा पंधरवड्यास आजपासून प्रारंभ

संबंधित बातम्या