विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी लक्षहिरा फाऊंडेशन कटिबध्द - विश्वजित किर्तीकर; आरे येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

by Team Satara Today | published on : 28 June 2026


सातारा : ज्या मातापित्यांनी आम्हाला शिक्षणाची गोडी लावली त्यांच्यामुळेच शिकू शकलो. शिक्षणामुळे आमची प्रगती झाली. त्या मातापित्यांच्या नावाने लक्षहिरा फाउंडेशन सुरु केले आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून आरे गावातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी आम्ही कटिबध्द राहू, अशी ग्वाही फाउंडेशनचे अध्यक्ष विश्वजित किर्तीकर यांनी दिली.

सातारा तालुक्यातील आरे तर्फ परळी येथील सिध्दार्थनगरमधील अंगणवाडीत झालेल्या कार्यक्रमात लक्षहिरा फाउंडेशनतर्फे आठवी ते बारावीतील अनुसूचित जाती जमातीतील गरजू, होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष मिलिंद किर्तीकर तसेच भिसे गुरुजी, कांबळे सर, राजश्री कांबळे तसेच लक्षहिरा फाउंडेशन व सम्राट युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

विश्वजित किर्तीकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा ही शिकवण दिली. आता काळ बदलला आहे. विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागत नाही. शिक्षण मिळत आहे. मात्र काहींना परिस्थितीमुळे अडचणी निर्माण होतात. अशा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याचे काम लक्षहिरा फाउंडेशन करणार आहे. यावेळी त्यांनी अंगणवाडीसाठी फॅन देणगी देण्याचे जाहीर केले.

यावेळी सिद्धार्थ नगरमधील श्रवण संतोष किर्ते, तनुश्री रमेश किर्ते, श्रुती अनिल किर्ते, श्रावणी गणेश किर्ते, रिया भीमराव किर्ते, श्रेया महेश भंडारे, सुमित विकास किर्तीकर, संदीप किर्ते, आरेतर्फ परळी गोवर्धननगर येथील प्रदीप दीपक भिंगारदिवे, युवराज संतोष भिंगारदिवे, विद्या सतीश भिंगारदिवे,  अंकिता सुरेश आडागळे, कोमल संतोष भिंगारदिवे, राज सतीश भिंगारदिवे, गौरव रुपेश भिसे, आदिती सचिन भिसे, अक्षदा सचिन भिसे, कुणाल देवदास आडागळे, जानवी अंकुश देशमाने, अमृता विकास भिंगारदेवे यांना शैक्षणिक मदत करण्यात आली.

यावेळी भिसे गुरुजी व मान्यवरांनी मार्गदर्शन केले तसेच लक्षहिरा फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.  सुनील किर्ते यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद किर्तीक़र यांनी आभार मानले.


 


 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रकला वॅगनआर कारची मागून जोरदार धडक; एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी अंत
पुढील बातमी
दमदार पावसाने सातारकर चिंब; शेतकरी आणि नागरिकांना काहीसा दिलासा

संबंधित बातम्या