स्टँड अप इंडीया मार्जिन मनी कार्यशाळा संपन्न

by Team Satara Today | published on : 12 April 2025


सातारा : समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित् आयोजित करण्यात येत असलेल्या सामाजिक सप्ताहानिमित्त १० एप्रिल रोजी स्टँडअप योजनेतंर्गत मनी मार्जिन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सहायक आयुक्त समाजकल्याण सातारा व यशवंतराव समाजकार्य महाविद्यालय,सातारा यांचे संयुक्त विद्यमाने सातारा शहरातील राजवाडा, पोवई नाका व मध्यवर्ती बस स्थानक परिसर याठिकाणी पथनाटयाचे सादरीकरण करण्यात आले. पथनाटय व लघुनाटिकेच्या माध्यामातुन भारतीय सविंधानाचा जागर,सामाजिक जागृती तसेच, विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपस्थित नागरिकांना देण्यात आली.

सदर कार्यशाळेत श्री.सरदार खोत,वरिष्ठ समाजिक कल्याण निरीक्षक,यांनी मनी मार्जिन या येजनेची  विस्तृत माहिती,लाभार्थी निकष,आवश्यक कागदपत्रे,लाभाचे स्वरुप याबाबत उपस्थितांना मार्गदर्शप केले. जिल्हा अग्रणी बँकचे व्यावस्थापक श्री नितीन तळपे यांनी योजनेचा कर्जपुरवठा व कागदपत्र पुर्तता यासंबधी मागदर्शन केले.नवउद्योजकांना प्रोत्साहन मिळावे याकरीता यशस्वी उद्योजक यांनी आपले अनुभव कथन केले.तरुण युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योगव्यवसायात पदर्पण करुन स्वत:बरोबर इतर युवकांना रोजगार उपलबध करुन देण्यासाठी उद्योजक बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त ,समाजकल्याण,सातारा या कार्यालयातर्फे करण्यात येत आहेत.या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणुन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री नितीन तळपे,तसेच या योजनेचा लाभ घेतलेले लाभार्थी नवउद्योजक,सामाजिक संघटनांचे विविध पदाधिकारी,सदस्य तसेच बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाश्वत शेतीसाठी फार्मर कप स्पर्धा हा प्रेरणास्त्रोत : श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले
पुढील बातमी
टंचाई सदृश्य गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी आराखडा करा : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

संबंधित बातम्या