अज्ञातांकडून एकावर शस्त्राने वार

सातारा : अज्ञातांनी एकावर शस्त्राने वार करुन जखमी केल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्‍यातील पारंगे चौकात अनोळखी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी एकावर धारदार शस्त्राने दंडावर मारुन गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी दत्तात्रय सर्जेराव पवार (वय 23, रा. दौलतनगर, सातारा) या युवकाने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 8 जानेवारी रोजी घडली आहे.


मागील बातमी
चोरीच्या प्रयत्नासह नुकसान प्रकरणी अज्ञातावर गुन्हा
पुढील बातमी
अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांना जाहीर

संबंधित बातम्या