सातारा : रस्ते अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी नेहा प्रताप पाटील (रा. ईश्वरपूर, ता. वाळवा, जि. सांगली) या दुचाकीवरून जात असताना खेड फाटा येथे तोल जाऊन पडल्याने त्यांच्या मेंदूला दुखापत झाली.
त्यांच्यावर यशवंत हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.