मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यामुळे महायुतीच्या गोटात विविध राजकीय बैठका, चर्चा होताना दिसत आहेत. आता नुकतंच अमित शाह यांची भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे एक बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. या बैठकीला अमित शाहांनी सर्व नेत्यांना अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ नये म्हणून जाहीर वाद करणे टाळा, अशी महत्त्वाची सूचना अमित शाहांनी यावेळी दिली.
अमित शाह यांची महायुतीतील महत्त्वाच्या नेत्यांसह भाजप नेत्यांसोबत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अमित शाह यांनी महायुतीतील नेत्यांना चांगलेच खडसावले. तसेच त्यांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही सूचनाही केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील चुका विधानसभेत करणं टाळा, अशी सूचना अमित शाह यांनी केली.
“महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ नये म्हणून जाहीर वाद करणे टाळा”, असेही अमित शाहांनी यावेळी सांगितले. “महायुतीतील नेत्यांनी संयम ठेवावा. महायुतीने एकजूट असल्याचे चित्र जनतेसमोर जाईल, याची काळजी घ्यावी. लोकसभा निवडणुकीतील चुका विधानसभा निवडणुकीत टाळा. लोकसभेचा फटका विधानसभेत नको. नेत्यांनी संयम ठेवावा, जाहीर वाद करु नका” , अशा महत्त्वाच्या सूचना अमित शाह यांनी दिल्या.
अमित शाह यांनी काल सह्याद्री अतिथीगृहावर मुक्काम केला होता. अमित शाह यांना भेटण्यासाठी भाजपचे अनेक दिग्गज नेते सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री रविंद्र चव्हाण असे अनेक दिग्गज नेत्यांनी अमित शाहांची भेट घेतली. आता दुपारनंतर पुन्हा एकदा महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडणार असल्याचे बोललं जात आहे. या बैठकीत महायुतीच्या जागावाटपाबद्दल निर्णय होणार असल्याचे बोललं जात आहे.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |