मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. सत्ता स्थापनेसाठी आता राज्यात हालचालींना वेग आला आहे. आज मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच महायुतीमधील तिन्ही पक्षांचे नेते आज दिल्लीत जाणार आहेत. दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे.
मुख्यमंत्रिपदाचे आज नाव जाहीर होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या माघारीनंतर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, आज सायंकाळपर्यंत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्रात नव्या मंत्रिमंडळाची स्थापना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजप नवीन मंत्रिमंडळात अर्धी पदे आपल्या पक्षाकडे ठेवू शकते. तर नवीन सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला तीन मोठ्या खात्यांसह महाराष्ट्रातील १२ कॅबिनेट पदे मिळू शकतात,अशी चर्चा सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिमंडळात नऊ जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळात जास्तीत जास्त ४३ मंत्री केले जाऊ शकतात. एकनाथ शिंदे यांच्याकडे मंत्रिमंडळात नगरविकास, सार्वजनिक बांधकाम खाते, जलसंपदा ही प्रमुख खाती मिळू शकतात, असं बोलले जात आहे.
तसेच उपमुख्यमंत्रिपदाबाबतही चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील नवा मुख्यमंत्री भाजपचा असू शकतो. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्रीही शपथ घेऊ शकतात. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून प्रत्येकी एक उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.
काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावर आपला दावा नसल्याचे जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
मकरंद पाटील यांचे साताऱ्यात जल्लोषी स्वागत |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
फोन उचलत नसल्याच्या कारणातून एकास मारहाण |
कार-दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बोगस प्रकल्पग्रस्तांचे दाखले देऊन फसवणूक करणारा जेरबंद |
...अखेर जखमी रमेश जगदाळे यांचे निधन |
ख्रिस्ती समाजाचे प्रश्न तातडीने सोडवणार : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले |
ना.जयकुमार गोरेंच्या मंत्रीपदाने युवा नेते शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानची सातारा शहरात एन्ट्री |
सत्ताधाऱ्यांनी अन्याय केला तर आंदोलनाने आवाज उठवू |
जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवा |
रचना प्रॉपर्टी एक्स्पो 2024 : बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचा अभिनव उपक्रम |
स्थानिक स्वराज्य संस्था पूर्ण ताकतीने लढूया... |
कामेरीचे जवान शुभम घाडगे यांना बलनोई येथे वीरमरण |
कॅबिनेट मंत्र्यांच्या समन्वयामुळे जिल्ह्याचा होणार विकास |

दगडाने मारहाण प्रकरणी एकाविरोधात गुन्हा |
अपघात प्रकरणी कार चालकावर गुन्हा |
मंगळवार पेठेतून दुचाकीची चोरी |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
शाहूनगरमधील घरफोडीची उकल |