सातारा येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत महिला व बाल सक्षमीकरणावर विशेष मार्गदर्शन कार्यशाळा; विविध उपक्रमांची सविस्तर माहिती

by Team Satara Today | published on : 12 October 2026


सातारा  : सातारा येथील हॉटेल लेक व्हियू येथे तनिष्का व्यासपीठाच्या विद्यमानाने विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय सातारा अंतर्गत राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात करताना जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र, सखी वन स्टॉप सेंटर आणि चाइल्ड हेल्पलाईन याविषयीची संपूर्ण माहिती उपस्थितांना देण्यात आली. तसेच केंद्रातर्फे हिंसाग्रस्त महिलांना दिल्या जाणाऱ्या मोफत सुविधा जसे की समुपदेशन, वैद्यकीय सेवा, पोलीस मदत, कायदेशीर सल्ला आणि तात्पुरती राहण्याची सोय यासारख्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती यावेळी सांगण्यात आली.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि मदतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे महिला हेल्पलाईन क्रमांक १८१, चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८, पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ आणि सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांक १९३० या टोल फ्री क्रमांकांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेमध्ये कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५, बाल संगोपन योजना, पोक्सो कायदा, अनाथ प्रमाणपत्र आणि बालविवाह प्रतिबंध कायदा यांसारख्या कायदेशीर बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली. आजच्या युगात मुलींनी प्रत्येक क्षेत्रात सक्षम असायला हवे, यावर विशेष भर देत उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात महिला सक्षमीकरण केंद्र विभागातील सोनाली देसाई, अनुजा पवार यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जलसेवा संकल्प अभियानांतर्गत वडूज, काळेवाडी व कोरेगाव येथे उपक्रम; पाणी बचतीसाठी पाणीवापर संस्थांच्या माध्यमातून सिंचनाचे नियोजन करण्याचे आवाहन
पुढील बातमी
दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाचा दिलासादायी पुढाकार; तात्पुरत्या मदतीसोबतच अन्न व जलसुरक्षेला प्राधान्य

संबंधित बातम्या