ढगाळ वातावरणामुळे बळीराजा धास्तावला

घेवडा काढणीला खो बसण्याची शक्यता

by Team Satara Today | published on : 21 October 2025


सातारा : ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहिल्याने बळीराजा चांगलाच धास्तावून गेला आहे. मागास पेरणीमुळे अनेकांनी सोयाबीन काढून मळणीसाठी शेतामध्ये तसेच ठेवले असून सध्या घेवडा काढणी सुरू असून येत्या एक-दोन दिवसात पाऊस पडल्यास त्याला खो असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यावर्षी सातारा जिल्ह्यात मे महिन्यापासूनच धुमाकूळ घातला होता. अतिवृष्टीमुळे बळीराजाचे प्रचंड नुकसान झाले होते.  विशेष करून हातात तोंडाला आलेले सोयाबीनचे पीक हातचे गेले. अति पावसामुळे पठार भागात यावर्षी भात लागण उशिरा करावी लागली. यावर्षी जिल्ह्यात पडलेल्या अति पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसल्यामुळे संसार उघड्यावर पडल्याचे चित्र दिसून आले होते. मोसमी पाऊस परतीच्या वाटेवर असाच गेल्या आठ दिवसात ऑक्टोबर हिट चा चटका चांगला जाणवत होता. उष्णतेमुळे नागरिक हैराण झाल्याचे चित्र दिसत असतानाच, भारतीय हवामान विभागाकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार रविवारपासून तापमानत घट होण्यास सुरुवात झाली. सोमवारी रात्री जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा शिडकावा झाला होता. यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन उशिरा पेरले होते. त्यांनी सोयाबीन काढून शेतामध्ये मळणीसाठी ठेवले आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात घेवडा काढून तो बडवण्याचे काम सुरू करण्यात आले असताना आज लक्ष्मीपूजन दिवशी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहण्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. येता दोन-तीन दिवसात पावसाला पुन्हा सुरुवात झाल्यास जेवढा काढण्याला खो बसणारा असून त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्यात साडेसहा हजार हेक्टरवर रब्बी हंगाम पेरणी पूर्ण
पुढील बातमी
महाबळेश्वर पाठोपाठ दिवाळी हंगामासाठी सज्जनगड, कास, बामणोली परिसर बहरणार

संबंधित बातम्या