सातारा : विघ्नहर्ता गणरायाच्या पाठोपाठ दाखल होणाऱ्या महालक्ष्मी अर्थात ज्येष्ठा व कनिष्ठा गौरीच्या स्वागताची घराघरात लगबग सुरू झाली आहे. गणपतीच्या सजावट साहित्य बरोबरच गौरींना सजवण्यासाठी लागणाऱ्या असंख्य प्रकारचे दागिने कंबरपट्टे, मंगळसूत्र, बोरमाळ, चपलाहार यासारखे असंख्य प्रकारचे दागिने तसेच विविध प्रकारचे मुखवटे आणि साड्यांनी बाजारपेठ साजल्या आहेत.
खरेदीसाठी महिलांची दुकानांमध्ये रात्री उशिरापर्यंत गर्दी दिसून येत आहे. यावर्षी गौरींचे आगमन मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी होत आहे. महिला वर्गासाठी अतिशय जिव्हाळ्याचा असा हा उपक्रम असल्यामुळे लग्नासारख्याच खरेदीसाठी घरोघर गौरी ना लागणाऱ्या विविध आकर्षक साड्या आणि दागिन्यांची दरवर्षी खरेदी केली जाते. या ज्येष्ठा व कनिष्ठा गौरींना साड्या नेसवण्यामध्ये महिलांचा उत्साह वाखण्यासारखा असतो. गौरीच्या सजविण्यामध्ये मंगळसूत्रा समावित कृषी मोहनमाळ, साज, कंबरपट्टे या पारंपारिक दागिन्यांबरोबरच आता टेम्पल ज्वेलरी प्रकारातील दागिने ही विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. मोत्यांचे हाराचे विविध प्रकार बांगड्या नवीन डिझाईन मध्ये उपलब्ध झाले आहेत. याचप्रमाणे कुंदन आणि मोत्यांच्या दागिन्यांना महिलांकडून विशेष पसंती होत असून, चांदीचे दागिने खरेदी करून त्याला सोन्याचा मुलांमध्ये देण्याचाही कल वाढतो आहे. दागिन्यांमध्ये विविधरंगी खड्यांचे नेकलेस, बाजूबंद, नथी, कंबरपट्टे तसेच सजावटीसाठी पडदे, फुलांच्या माळा याबरोबर पाचवारी, सहावारी आणि नऊवारी या दोन्ही प्रकारातील रेडिमेड साड्यांना महिलांकडून विशेष मागणी आहे.
गौरींचे मुखवटे साडी आणि दागिने असे एकत्रित पॅकेजही येथील सजावट साहित्य केंद्रामध्ये उपलब्ध असून संपूर्ण गौरीची आरास व सजावट करून देणाऱ्या ऑर्डर प्रमाणे कॉन्ट्रॅक्टरनाही मागणी आहे.
फुलांचे वाढते भाव लक्षात घेऊन कृत्रिम फुलांनाही विशेष मागणी असून, या सजावटीमध्ये गौरीपुढे मांडण्यात येणाऱ्या विविध प्रकारचे तिखट व गोड पदार्थ फराळ, तसेच मिठाई खरेदीवरही भर दिला जात आहे. फराळ आणि चटपटीत पदार्थांसाठी अनेक महिला बचत गटांकडे ऑर्डर चे प्रमाण वाढत असून घरी हे फराळाचे पदार्थ करण्यापेक्षा अडीचशे ग्रॅम, अर्धा किलो, एक किलो या आकारमानात हे पदार्थ ऑर्डर देऊन महिला खरेदी करत आहेत. गौरीच्या पारंपारिक वेशभूषेंबरोबरच नऊवारी नेसलेली तसेच शंकर-पार्वती रूपातील आणि अगदी नव्या युगातील स्कूटर वर बसलेल्या, जात्यावर पीठ काढणाऱ्या अशा पारंपारिक गौरीच्या तयार मूर्तीही विक्रीस उपलब्ध आहेत.
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा |
कराड परिसरातील 92 गुन्हेगार हद्दपार |
सातारा तालुक्यातून १२ इसम हद्दपार |
तडीपार सराईत दुचाकी चोरटा जेरबंद |
लिंगायत समाज हिंदू धर्माचा अविभाज्य घटक : खासदार अजित गोपछडे |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा |
सणांच्या पार्श्वभूमीवर 14 गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून तात्पुरते हद्दपार |
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणार्या हॉस्पिटलला धडा शिकवणार |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा |
सणांच्या पार्श्वभूमीवर 14 गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून तात्पुरते हद्दपार |
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणार्या हॉस्पिटलला धडा शिकवणार |
गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी |
सावलीत उद्या खेळ पैठणीचा कार्यक्रम |
कष्टकरी-उपेक्षितांच्या चळवळीसाठी डी. व्ही. पाटील यांचे योगदान मोलाचे |
झेडपीसमोर रस्त्यासाठी उपोषण |
शिर्डीत जुनी पेन्शन संघटनेचे १५ रोजी पेन्शन महाअधिवेशन |