सातारा : सुमारे 14 लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 सप्टेंबर ते 16 नोव्हेंबर 2024 दरम्यान युवराज अन्याबा काटे रा. कृष्णानगर, सातारा यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करून त्यातून दुप्पट नफा करून देण्याचे आश्वासन देऊन 13 लाख 95 हजार 836 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी राजीव जैन आणि श्रीमती अवंतिका देव यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेलार करीत आहेत.