हद्दपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी धीरज ढाणे याच्यावर गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 20 April 2026


सातारा : महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत हद्दपारीची कारवाई करण्यात आलेल्या एका व्यक्तीने आदेशाचा भंग केल्याची घटना सातारा शहरात उघडकीस आली आहे.या प्रकरणी धैर्यशील उर्फ धीरज जयसिंग ढाणे (वय ३४,रा.चिमणपुरा पेठ,सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धीरज ढाणे याच्याविरुद्ध हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक, सातारा यांनी क्र. स्थागुशा १६/२५ अन्वये आदेश जारी केला होता. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ च्या कलम ५५ प्रमाणे दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी हद्दपारीचे आदेश लागू करण्यात आले होते.

तथापि, या आदेशाचा भंग करून धीरज हा सातारा शहरातील मंगळवार पेठ येथील नारायण कृपा अपार्टमेंट, रामाचा गोठ परिसरात आपल्या सध्याच्या राहत्या घरी विनापरवानगी वावरताना आढळून आली.या प्रकरणी धीरज ढाणे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास महिला पोलीस हवालदार हिरवे करत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
क्षेत्रमाहुली येथे दुर्दैवी अपघात; दुचाकी घसरून एकाचा व्यक्तीचा मृत्यू
पुढील बातमी
सातारा शहरात भरधाव दुचाकीच्या धडकेत पती-पत्नी जखमी; धडक देणाऱ्या दुचाकी चालकावर गुन्हा

संबंधित बातम्या