पुणे : पुण्याजवळच्या वरंध घाटात भीषण अपघात झालाय. ९ जणांना घेऊन जाणारी इको कार १०० फूट खोल दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. तर ८ जण जखमी आहेत. काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतेय. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुण्यातील भोर - महाड मार्गावरील वरंध घाटात पहाटे भीषण अपघात झालाय. ९ जणांना घेऊन जाणारी इको कार 100 फूट खोल दरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात एक जणाचा मृत्यू झालाय, तर 8 जण जखमी आहेत. जखणींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमधील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.
मिळालेल्या माहितीनुसार, इको कार महाडहून भोरच्या दिशेने येत होती. त्यावेळी पहाटे चार वाजता वरंध घाटातील उंबरडे गावच्या हद्दीत कार अचानक १०० फूट खोल दरीत कोसळली. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
वरंध घाटातील अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याशिवाय बचाव पथकही तात्काळ पोहचलं. स्थानिक शिरगाव रेस्क्यू पथकाच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांच्या मदतीने जखमींना बाहेर काढलं. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
शुभम शिर्के असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंगेश गुजर वय 26, आशिष गायकवाड वय 29, सिद्धार्थ गंधणे वय 26, सौरभ महादे वय 22, गणेश लवंडे वय 27, अमोल रेकीणरं वय 27, यशराज चंद्र वय 22, आकाश आडकर वय 25 हे जखमी झाल्याल्यांची नावं आहेत. भोर पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.