सातारा : सासपडे, ता. येथील अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तिच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी याबाबतचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाणार आहे. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी राज्य महिला आयोगामार्फत शिफारस करणार असल्याचे आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी सांगितले.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर यांनी सासपडे येथे जाऊन, चव्हाण कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी उपस्थित होते. चाकणकर म्हणाल्या, चव्हाण कुटुंबाला कोणताही त्रास होऊ नये, यासाठी त्यांना पोलीस संरक्षण द्यावे. या कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून तातडीने मदत करावी. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनही मदत मिळवून देण्यात येईल. राज्य महिला आयोग या कुटुंबाच्या पाठीशी आहे. न्यायालयात जास्तीत जास्त सबळ पुरावे सादर करून, आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील. सासपडेसारखी घटना जिल्ह्यात पुन्हा घडू नये, यासाठी ‘पोक्सो’मधील जे गुन्हेगार बाहेर आहेत, ते सध्या काय करत आहेत, याची तपासणी करावी. ते काही गैरवर्तन करत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी.